Thursday, April 18, 2024
Homeराज्यमोठी बातमी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा...

मोठी बातमी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई :  ग्राम विकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेकडील गट – क संवर्गातील मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या परीक्षेचे आयोजन ७ आणि ८ ऑगस्ट करण्यात आले होते, मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या कारणांमुळे परीक्षा ढकलली पुढे

– सर्वोच्च न्यायालयाने दि. ५ मे २०२१ रोजी सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भातील कायदा रद्द केला आहे, त्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) प्रवर्गातील जागा अराखीव प्रवर्गात रुपांतरीत झाल्याने मार्च, २०१९ च्या जाहिरातीमधील खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणामध्ये बदल झाला आहे.

– अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांचे प्रमाण काही कालावधीसाठी १० टक्केवरुन २० टक्के केल्यामुळे व जिल्हा परिषदेने त्याप्रमाणे अनुकंपा भरती प्रक्रिया केल्यामुळे व अन्य कारणांस्तव प्रवर्गनिहाय / समांतर आरक्षणनिहाय जागांमध्ये बदल होत आहे.

– दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ठ प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिध्द करुन उमेदवारांना दि. १ जुलै, २०२१ पासून मे. न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. यांच्याद्वारे www.maharddzp.com या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन / रि – रजिस्ट्रेशन करणे शक्य होणार नाही.

या बदलांमुळे परीक्षेच्या आयोजनासाठी अधिकचा कालावधी लागणार असल्याने ही परीक्षा पुढे ढकलली असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच, सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे देखील राज्य सरकारने सांगितले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय