Thursday, January 16, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी शहर काँग्रेस मध्ये इनकमिंग सूरू, विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केला काँग्रेस...

पिंपरी शहर काँग्रेस मध्ये इनकमिंग सूरू, विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केला काँग्रेस मध्ये प्रवेश

पिंपरी, (दि.२५) : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसमध्ये आज शहरातील भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्षाच्या व सामाजिक संघटनातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

यामध्ये भारतीय जनता पक्षाचे झोपडपट्टी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ जगताप, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा छाया देसले, काळेवाडी भागातील रॉयल फांऊडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी नांगरे व ख्रिश्चन एकता मंच संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पठारे यांनी आपल्या समर्थकांसह आज खराळवाडी पिंपरी येथील हिंद कामगार संघटनेच्या हॉल मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी भाजपा झोपडपट्टी विभागाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ जगताप म्हणाले, “काँग्रेसची विचारधाराच या काळात देशाला सांभाळू शकते व या विचारधारेवर देशातील जनतेचा, गोर गरीब, सर्व धर्मीयांचा व सर्वसामान्यांचा विश्वास आहे व तो विश्वास कैलास कदमांच्या रूपाने शहरात सिध्द करत काँग्रेस कार्यकर्ते परिवर्तन घडविणार आहेत अशीच परिस्थिती सद्यस्थितीत आहे”

शेतकरी कामगार पक्षाच्या माजी महिला शहर अध्यक्षा छाया देसले म्हणाल्या, “सध्याच्या परिस्थितीत देशाला काँग्रेसची गरज आहे, वाढती महागाई इंधन दरवाढ व इतरही अनेक सामाजिक समस्यांना कारण भाजपाचे धोरण आहे, मनपामध्ये सुध्दा भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. या परिस्थितीत प्रभावी असलेल्या काँग्रेसच्या समतावादी विचारांमुळे व कैलास कदमांच्या नियुक्तीमुळे शहरात उत्साह निर्माण झाला आहे व त्यामुळे आज पक्ष प्रवेश करत आहे” 

तसेच डॉ. कैलास कदम म्हणाले, “आपला सर्वांचा पक्षात मानसन्मान राखला जाईल व नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्वांना पक्ष संघटनेत योग्य स्थान देऊन निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान दिले जाईल, तसेच येणारा काळ हा अत्यंत महत्वाचा असून त्यात आपले सर्वांचे योगदान शहरात सत्ता परिवर्तनाच्या लढ्यात महत्वपूर्ण राहील याचा मला विश्वास आहे.”

या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिचंवड काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, शहर काँग्रेस एससी विभागाचे शहराध्यक्ष बाबा बनसोडे, एससी विभागाचे शहर उपाध्यक्ष विजय ओव्हाळ, आबा खराडे, माऊली मलशेट्टी, बबलू तामचीकर, नाना गायकवाड, दिपक गंगावणे, बबलू जोसेफ, बाबू राठोड, प्रथम नांगरे, प्रतिक धावारे, अल्ताफ शेख आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख

लोकप्रिय