Thursday, February 6, 2025

शिक्षण क्षेत्रातून सेमिस्टर पद्धत रद्द करून वार्षिक परीक्षा पद्धती सुरू करा – प्रा. डॉ. भाऊसाहेब झिरपे

औरंगाबाद शिक्षण क्षेत्रातून सेमिस्टर पद्धत रद्द करून वार्षिक  परीक्षा पद्धती सुरू करा, अशी मागणी प्रा. डॉ. भाऊसाहेब झिरपे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या आपल्या राज्यात शिक्षण क्षेत्रात सेमिस्टर पद्धती आहे. यात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांचा ज्ञानार्जना ऐवजी कागदी घोडे नाचवण्याचा नुसता केविलवाणा प्रयत्न गेली कित्येक वर्ष सुरू आहे. त्याचबरोबर वर्षातून दोन वेळा प्रवेश शुल्क व दोन वेळा परीक्षा शुल्क आकारले जात असल्याने पालक मेटाकुटीला येत आहेत. ही पद्धत म्हणजे पालकांच्या खुल्या लुटीचा परवाना ठरत आहे.

विद्यापीठाने ठरवून दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारे शिकवून होत नाही. मात्र प्रोटोकॉल म्हणून कागदीघोडे सर्वत्र नाचवले जात आहेत. दुसऱ्या बाजूला परीक्षेत पर्यायी प्रश्न, रिकाम्या जागा असली उत्तरे विद्यार्थी घोकंपट्टी ने नसता गुगल सर्च करुन सोडवत असल्याचे निदर्शनात आले आहे यामुळे ऑनलाईन परीक्षा हा तर निव्वळ सोपस्कार पार पाडण्याचा प्रकार ठरला आहे. विद्यापीठांचा सृजनशील व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले नागरिक घडवण्याच्या मुख्य उद्देशाला हारताळ फासला जात आहे तर फक्त परीक्षा शुल्क आकारणारे विद्यापीठ प्रवेश शुल्क गोळा करणारी महाविद्यालये आणि परीक्षार्थीं विद्यार्थी असा पेच निर्माण झाला आहे. जे सामाजिक हितासाठी बाधक ठरत आहे, असेही झिरपे यांनी म्हटले आहे.

सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत वर्षातून दोन वेळा प्रवेश घेणे व दोन वेळा परीक्षा देणे गरजेचे नाही. त्याऐवजी थेट एकदाच प्रवेश व वार्षिक परीक्षा पद्धतीचाच स्विकार करावा गुण पत्रकावरचे ग्रेड वाढण्यापेक्षा विद्यार्थ्यांना गुण आणि ज्ञान दोन्ही मिळायला हवेत. यामुळे तातडीने उच्च शिक्षणातून सेमिस्टर पद्धती रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घ्यावा जो संपूर्ण देशात मार्गदर्शक ठरेल असेही प्रा. डॉ. भाऊसाहेब झिरपे यांनी केली आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles