Wednesday, April 24, 2024
Homeजिल्हाजिल्ह्यातील अद्यापही बंद असलेल्या शाळा त्वरित सुरू करा - राजेंद्र पाडवी

जिल्ह्यातील अद्यापही बंद असलेल्या शाळा त्वरित सुरू करा – राजेंद्र पाडवी

तळोदा : शासनाने दि.५ जून २०२१ चा परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील शाळा इ.८ ते १२ पर्यत वर्ग १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. परंतु, अद्यापही बऱ्याच कोविड मुक्त भागात शाळा सुरू झालेल्या नाहीत. बऱ्याच ठिकाणी शाळा सुरू झाल्या तरी शाळेत विद्यार्थी नाहीत. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

मागील वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे न भरून येण्यासारखे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आर्थिक परिस्थिती, हॅन्डराईड मोबाईल, मोबाईल आहे तर नेटवर्क नाही याकारणाने ऑनलाईन शिक्षणही झाले नाही. 

तरी कोविड नियमांचे पालन करून इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन वर्ग शाळा व्यवस्थापन समिती ठराव, ग्रामपंचायत ठराव, पालकांचे संमती पत्र घेऊन त्वरित शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा सूचना संबंधित मुख्याध्यापक यांना देण्यात यावे अशी मागणी राजेंद्र पाडवी यांनी पालकमंत्री, प्रकल्प अधिकारी तळोदा, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक नंदुरबार यांच्याकडे केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय