Ambegaon : आंबेगाव तालुक्यातील गावागावांत पंचायत समिती आंबेगाव, आरोग्य व एकात्मिक बाल विकास सेवा योजना – आंबेगाव, आदिम संस्कृती अभ्यास संशोधन व मानव विकास केंद्र – आंबेगाव व अनुसंधान ट्रस्ट – साथी – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य व पोषण यात्रा काढण्यात आलेली आहे.
घोडेगाव – पंचायत समिती आंबेगाव, आरोग्य व एकात्मिक बाल विकास सेवा योजना – आंबेगाव, आदिम संस्कृती अभ्यास संशोधन व मानव विकास केंद्र – आंबेगाव व अनुसंधान ट्रस्ट साथी – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जन आरोग्य समिती बळकटीकरण’ प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून आंबेगाव तालुक्यात सुरु आहे. सर्वसामान्य लोकांना आरोग्य व पोषण सेवांचा लाभ जास्तीत जास्त मिळावा या करता लोक सहभाग वाढवण्याचा प्रयत्न या प्रक्रियेतून करण्यात येत आहे. (Ambegaon)
या प्रक्रियेचा भाग म्हणून आरोग्यविषयक महत्त्वाच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य, सेवा व सुविधांचे महत्त्व वाढवण्यासाठी ‘आरोग्य व पोषण यात्रा’ आंबेगाव तालुक्यातील १० गावांमध्ये आयोजित केलेली आहे. या आरोग्य यात्रेचा उद्देश नागरिकांना पोषण, स्वच्छता, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग, माता आणि बाल आरोग्य, बालविवाह थांबवणे आणि आरोग्य सेवा मजबूत करण्यात समुदायाची भूमिका यासारख्या विषयांवर शिक्षित करणे आहे.
ही आरोग्य यात्रा दि.२१/०१/२०२५ रोजी शिनोली येथून सुरु होणार आहे, तर दि.२३/०१/२०२५ रोजी कुशिरे बुद्रुक येथे शेवट होणार आहे. यात्रेदरम्यान संसर्गजन्य आजारांविषयी जागरूकता सत्रे, संवादी उपक्रम, रॅली, पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शने, समुदाय गटांसोबत गाव बैठका, अंगणवाडी मध्ये जाणाऱ्या बालकांच्या पोषणाचे चावडी वाचन , महिलांमधील अनेमिया (रक्तपांढरी), व्यसनाचे परिणाम इत्यादी विषयी माहिती देण्यात येत आहे.
आज शिनोली येथील मायंबावाडी (ठाकरवस्ती), इंदिरानगर येथील कातकरी वस्तीवर या आरोग्य व पोषण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुमेह, बालविवाह याविषयी नाटक सादर करण्यात आले. अनेमिया विषयी मार्गदर्शन उपस्थीत महिला व नागरिकांना करण्यात आले.

यावेळी सरपंच मंगेश पारधी, निलेश बोऱ्हाडे, आरोग्य वर्धीनी उपकेंद्र शिनोली येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संतोष ठोकळ, आरोग्य सेविका निर्मला ढमढेरे, आरोग्य सेवक उदय मडके, साथी संस्थेचे शैलेश डिखळे, आदिम संस्थेचे समीर गारे, दिपक वालकोळी, सुप्रिया मते, रोहिदास फलके, दिनेश वालकोळी, सतिश लोहकरे, सुशीला गभाले आदी यावेळी उपस्थित होते.


हे ही वाचा :
जिओचा ग्राहकांना मोठा दणका, ‘हा’ प्लॅन 100 रूपयाने महागणार
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित
दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी
राज्यातील ‘या’ ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, प्रशासनाकडून ‘अलर्ट झोन’ घोषित
अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान