Thursday, April 25, 2024
Homeजिल्हाएस टी महामंडळाची वाटचाल खाजगीकरणाकडे; वाहक, बसेसही कंत्राटदारांमार्फत...

एस टी महामंडळाची वाटचाल खाजगीकरणाकडे; वाहक, बसेसही कंत्राटदारांमार्फत…

कोल्हापूर : एस टी महामंडळाचे खाजगीकरण रोखा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे कोल्हापूर शहर अध्यक्ष इंजि. अभिजीत पांडुरंग कदम यांनी केली आहे. तसेच एस टी महामंडळाच्या खाजगीकरणाचा डाव त्वरित थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कदम म्हणाले, एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांनी पुकारलेला ऐतिहासिक संप नुकताच भारतभर गाजला. यामध्ये शासनात विलीनकरण आणि इतर प्रमुख मागाण्यांसाठी कर्मचारी आपल्या सर्व कुटुंबासोबत रस्त्यावर उतरले होते. सपंकाळात गोरगरिबांचा आधार असणारी लाल परी वाहतूकीस बंद असल्यामुळे जनतेचे आतोनात नुकसान झाले. तरीही कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने या संपाला मूक संमती देऊन अप्रत्यक्ष पाठिंबा देत सहकार्य केले.

नुकतच महाइटेंडर्स वेबसाईट वरून
2022/MSRTC/TR/DRIV/HRD/1684 ही निविदा प्रसिद्ध झाली होती. याद्वारे एस टी महामंडळाच्या पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्याकरिता कंत्राटदारामार्फत 3000 वाहक पुरवण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. सदर पुरवठा 3 वर्ष कालावधी करिता असल्याचे निविदेत नमूद आहे. यापूर्वी एस टी महामंडळाने कंत्राटीपद्धतीने केलेली भरती ही महामंडळाने थेट स्वतःकडील पे रोल वर केली होती. मात्र, यावेळी प्रथमच ती ठेकेदारामार्फत होणार आहे.

एकीकडे शासनात विलीनीकरणसाठी कर्मचारी संघर्ष करत असताना दुसरीकडे खाजगीकरणाचा घाट सुरु असल्याच हे विदारक चित्र आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा मार्फत प्रसिद्ध केलेल्या ST/TR/ORDHIRED/1361 या निवेदेद्वारे सांगली जिल्ह्याकरिता 7 वर्षाकारिता 100 बसेस कंत्राटदारामार्फत मागविण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रभर अशाच प्रकारे ठेकेदारामार्फत चालक आणि बसेस पुरवले गेल्यास भविष्यात एस टी महामंडळ भांडवलदारांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. एकीकडे बुलेट ट्रेन, मेट्रोरेल, मोनोरेल साठी लाखो करोड रुपयांचा खर्च केला जात असताना, सामान्य जनतेची लालपरी आणि एस टी महामंडळ जाणीवपूर्वक भांडवलदारांच्या घशात घातल जात आहे. याचा पुरोगामी युवक संघटना निषेध करत असून एस टी महामंडळाच्या खाजगीकरणाचा डाव त्वरित थांबवावा अशी मागणी करत असल्याचेही कदम म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय