बेंगळुरू: कर्नाटकातील रायचूर येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढून टाकण्याचा आदेश दिल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीशांवर कारवाईची मागणी करण्यासाठी बेंगळुरूमध्ये शनिवारी विशाल मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. “या कृत्याविरुद्ध कारवाई केली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र काढून टाकल्याच्या घटनेबाबत दलित समाजाच्या नेत्यांनी मला सविस्तर समजावून सांगितले आहे. याबाबत मी संबंधित लोकांशी चर्चा करून लवकरच पत्र लिहिणार आहे, असे ते म्हणाले.
मोठी बातमी : मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक
दहावी, बारावीच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
सरकारी आदेशानुसार महात्मा गांधींच्या फोटोशेजारी डॉ. आंबेडकर यांचा फोटो लावणे आवश्यक आहे असे काही वकिलांनी माझ्याकडे येऊन सांगितले. मात्र, सरकारचा हा आदेश उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे असून, त्याचा निकाल येईपर्यंत थांबावे लागेल असे मी त्यांना सांगितले,” असे गौडा यांनी निवेदन प्रसिद्ध करून म्हटले आहे
आंदोलनादरम्यान, बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) प्रदेशाध्यक्ष एम कृष्णमूर्ती म्हणाले, “आंबेडकरांच्या नावाने निवडणुका जिंकणारे अनेकजण मनुवादाचे (मनुस्मृतीचे) गुलाम बनत आहेत, हे निंदनीय आहे. यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा उघडपणे अपमान करण्यात आला आहे. न्यायमूर्ती मल्लिकार्जुन गौडा यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. शुक्रवारी, गौडा यांची कर्नाटक राज्य परिवहन अपीलीय न्यायाधिकरण, बेंगळुरूचे पीठासीन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी !
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती