अण्णासाहेब मोरे यांचे महाप्रवचन
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:श्री स्वामी समर्थ सेवा सत्संग आयोजन समिती,पुणे जिल्हा विद्यमाने 11 फेब्रुवारी-शनिवार- 2023 रोजी ‘ग्राम व नागरी विकास अभियान’ आयोजित करण्यात आले आहे.
मोशी,पिंपरी चिंचवड,पुणे नाशिक हायवे आंतराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या (PIECC) मैदानावर सायंकाळी 4 वा वैचारिक,सांस्कृतिक,अध्यात्मिक महाप्रबोधन महासत्संग आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती पुणे जिल्हा समितीचे संचालक सतीश मोटे यांनी दिली आहे.

गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रवचनातून पर्यावरण,आधुनिक शेती,व्यक्तिगत समस्या निवारण,विवाह संस्कार,आरोग्य शिबीर व चिकित्सा,बालसंस्कार,वृक्ष,वास्तूपूजा,भारतीय संस्कृती व अध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे,या महासत्संगामघ्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सेवेकरी महेश पोळ यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे संयोजन सेवेकरी सतीश मोटे,अशोक जाधव,सचिन थोरवे,सचिन बिरले संयोजक रामेश्वर निकम,विश्वनाथ पवार,महेश पोळ,देविदास भोंग,बंडूजमदाडे,संजय हजारे,संतोष खिरे,संजय महामार्गे,लकीचंद गुजर,शिवाजी केदारी,कुलदीप राठोड,गोरक्षनाथ काकडे,शिवाजी साधुले व सर्व सेवेकरी महिला पुरुष यांनी केले आहे.
