चित्रपट सृष्टीत मानाचे स्थान असलेल्या ऑस्कर अकॅडमीकडून ‘जय भीम’ चित्रपटाचा विशेष सन्मान
अमेझॉन ओटीटीवर ‘जय भीम’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात भारतातील जातीय विषमता आणि त्यामुळे आदिवासी समुहांना भोगाव्या लागणाऱ्या वेदना आणि जगावे लागणारे गुन्हेगारांचे जीवन दाखवण्यात आले आहे. देशभरात या चित्रपटाचे कौतुक झाले. त्याचबरोबर याची जगभरात चर्चा झाली. आता तर चित्रपट सृष्टीत मानाचे स्थान असलेल्या ऑस्कर अकॅडमीने या चित्रपटाचा विशेष सन्मान केल्यामुळे सर्व भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत.
आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर ऑस्करने ‘जय भीम’ चित्रपटाला स्थान दिले आहे. ऑस्कर अॅकडमीचे सदस्य असलेल्या प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांच्या मुलाखती आणि चित्रपटांचेसीन या चॅनलवर दाखवले जातात. आता जय भीमचा यात समावेश झालाय. असा सन्मान मिळवणारा जय भीम पहिला तामिळ चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेता सूर्याची आहे. सूर्याने यात आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या वकील चंद्रू यांची भूमिका साकारली आहे.
पुष्पा चित्रपटाने तोडले बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड
जय भीम चित्रपटाचा जो व्हिडीओ ऑस्करने रिलीज केला आहे त्यात या चित्रपटातील काही विशेष सीन दाखवण्यात आले आहेत. याशिवाय चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक ग्नानवेल यांची मुलाखतही दाखवण्यात आली आहे. या मुलाखतीत ते या चित्रपटाची कथा आणि त्यातील काही निवडक सीनबद्दल माहिती देत आहेत.
व्हिडीओच्या सुरुवातीलाच एका तुरुंगातून काही कैदी बाहेर येतानाचा सीन आहे. यावेळी तुरुंग अधिकारी शिक्षा भोगून बाहेर येत असलेल्या कैद्यांना त्यांची जात विचारताना दिसतात. तसेच जे कैदी कथित खालच्या जातीचे आहेत, त्यांना वेगळे उभे करून नंतर स्थानिक पोलिसांकडून पैसे घेत त्यांच्या हवाली करतात. या कैद्यांवर स्थानिक पोलीस त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाचे गुन्हे दाखवून त्यांना पुन्हा अटक करताना दिसते.
10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !
ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’