Sunday, December 8, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : वाचाल तर वाचाल - दिपाली मारोटकर

विशेष लेख : वाचाल तर वाचाल – दिपाली मारोटकर

पुस्तक वाचणे, आणि त्यातीत वाचलेला एखादा तरी भाग सतत आठवणीत राहणे, याला खूप महत्व आहे,पुस्तक तर कोणताही व्यक्ती वाचतो, पण त्या वाचण्याला काहीच महत्व नाही. त्यातील वाचलेला भाग संपूर्ण पणे समजला काय? त्यातील असे काही शब्द आपण आत्मसात केले आहे काय ? याला महत्त्व असते. सुरवातीला एखाद्या छोट्या लेकराला पुस्तकाची ओळख सुद्धा नसते, जस जसा तो मोठा होत जातो, तस तसा त्याचा समज, जाणीवा समृद्व होत जाऊन वाचणाची अधिक भूक निर्माण होते जाते. पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होते, माणसाने पुस्तक प्रेमी असायलाच पाहिजे, आपल्याला या पुस्तकातून बरेच काही शिकायला मिळते. कधी कधी कशाचा विचार आला तर, सहज पण एखादं पुस्तक वाचा सर्व विचाराला दूर लोटून तुम्ही त्या पुस्तकाचा विचार करत राहाल.

पुस्तकातून मिळणारे ज्ञान प्रत्येकालाच घेता येत नाही, कोणाला खूप चांगल्या प्रकारे वाचता येते तर, कोणाला वाचल्यावर सुद्धा त्याचा अर्थ कळत नाही. ज्याप्रकारे वाचण्याचा छंद असतो, त्याचप्रमाणे एखाद्या वाक्याचा अर्थ काय हे सुद्धा समजणे आवश्यक आहे. कारण कोणतेही पुस्तक वाचल्यावर त्यात कोणते मत आहे, आपले हाव भाव त्या मतावर काय सांगतात, हे पुस्तक वाचण्याऱ्याच्या लगेच लक्षात आले पाहिजे. कोणतेही गोष्ट करण्याआधी आपल्यासाठी अवघडच असते, प्रयत्न केले तर, अशक्य गोष्ट आपण शक्य करू शकतो. अनेक साहित्यिक, लेखक, कवी यांनी वाचन करून आपल्या आत लपलेली कला बाहेर आणून आपले अस्तित्व घडवले.

प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, तसेच प्रत्येकाचे मत सुद्धा वेगवेगळे असतात. स्वामी विवेकानंदांचे पुस्तक वाचले की असे वाटते किती छान विचार आहे. मनाला हर्षित करून जातात, इतके सुंदर विचार माणसात चांगले परिवर्तन घडून आणतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञान, ग्रंथ संपदा खूपच भव्य दिव्य होती, त्यांना पुस्तक वाचण्याची आवड होती. तशीच आवड प्रत्येक व्यक्तीला असायला हवी, पुस्तक वाचल्यामुळे माणसात खूप काही चांगले विचार दिसून येतात. लहानपणापासून पुस्तक वाचणे म्हणजे यशाकडे वाटचाल असते. चांगले विचार,चांगली प्रेरणा माणसाला पुस्तकातूनच मिळते, कित्येक कवी, लेखक, असतात. त्यांचे ते मनाला मोहून टाकणारे विचार, खूप काही शिकवतात. प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त वाचन केले पाहिजे, वाचण्यापासुन आपल्याला, प्रेरणा मिळते. यशप्राप्तीची खरी सुरवात होते, एकमेकासोबत बोलता बोलता आपण खूप काही बोलून जातो, पण त्यात काही बोल वाईट तर, काही चांगले राहतात, पण एखादं पुस्तक जर वाचलं ना तर, आपल्या जगण्याला आणि वागण्याला एक नवीन दिशा मिळते.

पुस्तक प्रेमी जर मणूष्य असला तर, तो कोणतेही पुस्तक असो वाचतच राहिल, आणि कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असो तो सांगिल्याशिवाय राहणार नाही, असे अनेक प्रेरणादायी पुस्तक आहेत. ते सर्वांनी वाचले पाहिजे, कारण त्या वाचण्यातून मिळणारी प्रेरणा खूप काही शिकवते. आपल्या कडे मोठी संपत्ती नसली तरी चालेल पण असं काही लिहून ठेवा की मेल्यावर आपलं एक जरी वाक्य वाचलं तर, वाचणाऱ्याच्या डोळ्यात आपले प्रतिबिंब दिसले पाहिजे. आपली किंमत कोणाला पण आपण नसल्यावरच कळते, म्हणून वाचन करून स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कारी, समृद्ध बनवा, आणि पुस्तक वाचा, पुस्तक आपला मित्र आहे. जेव्हा काय करावे सुचलं नाही तर, बिनधास्त एखादं पुस्तक वाचा खूप काही शिकायला मिळेल, आणि तेच जीवनात कधीतरी आपल्याच उपयोगी पडेल. मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थीच असतो, म्हणून पुस्तक वाचत राहा, आणि काहीतरी नवीन शिकत राहा, आयुष्य सुंदर बनेल.

पुस्तक वाचून मिळते ज्ञान

सुंदर बनते आपले जीवन

एखादे जरी वाचले पुस्तक

हरखून जाईल आपले मन..!

✒️ दिपाली निरंजन मारोटकर

      रा.पळसखेड, जि.अमरावती

संबंधित लेख

लोकप्रिय