Wednesday, August 17, 2022
Homeरविवार विशेषविशेष लेख : एक महामारी....... ! - प्रा. महेश देवकर

विशेष लेख : एक महामारी……. ! – प्रा. महेश देवकर

spot_imgspot_imgspot_imgspot_img

प्रथमत: मी थोडक्यात आढावा घेतो कोरोना मारामारीचा. यामध्ये सर्वजण आता एका भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहे. ही भीती दुसरी तिसरी कोणती नसून ती म्हणजे कोरोना ही आहे. मृत्यू चे दुसरे नाव जणू काही सध्याच्या घडीला कोरोना हेच आहे. या पृथ्वीवर याआधीही मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या महामारी येऊन गेलेल्या आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मानवाचा मृत्यू झालेला आपणास इतिहास पाहता येईल. मृत्यू ही दोन अक्षरे जरी थोडी विभक्त केली तर आपल्याला समजून येईल. आणि आपली थोडी भीती दूर होईल.

आता मला सांगा तुम्ही या जगात जो कायमस्वरूपी जिवंत असा कुणी आहे का ? तर नाही या पृथ्वीवर प्रत्येक जण मरणार आहे आणि मरणारच आहे. असं नाही की एखादा व्यक्ती कायम येथे आहे तो मरत नाही किंवा असेही नाही. की, अमेरिका इंग्लंड देशात लोक ज्यादा मारतात. आणि भारतात कमी मारतात असेही नाही. जेवढे लोक जन्म घेतात तेवढे लोक मरतातच याच्या आधी पण मारामारी चालूच आहे. महामारीचा अर्थ असा अर्थ काय असतो. तर ज्याचा वाचण्याचा कोणताच उपाय नाही किंवा ज्याला कोणतेच औषध कामी येणार नाही. साधारण आजाराला आपण आजार म्हणतो का ? तर तेथे औषध, इंजेक्शने किंवा लसीने तो आजार नष्ट होतो. महामारी म्हणजे जेथे कोणतेच औषध उपयोगी होणार नाही कोणतेच उपाय कामी येणार नाही आणि शेवटी मृत्यू हा जी के याला महामारी  म्हणता येईल. या पृथ्वीवर जसा आपला जन्म झाला तसा आपला मृत्यू हा अटळ आहे. थोडे उशिरा किंवा लवकर ही मरणाचे प्रक्रिया घडेल पण ही क्रिया तर घडणारच आहे ती कोणीच टाळू शकत नाही. पण आपण भीती टाळून त्या महामारीचा सामना करू शकू. 

हेही वाचा ! ‘अजितदादा आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल’ – शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सूचक इशारा !

एक खूप खूप जुनी ही गोष्ट आहे आणि खूपच मानसशास्त्र बाबत यामध्ये आहे एक साधू गावाच्या बाहेर बसलेले होते. त्यांना तिथे एक गोष्ट दिसली की एक काळी सावली की खुपच जोराने गावाकडे जात होती. गावाच्या बाहेर असतो बसलेला साधू तो म्हंटला, थांब ! त्या सावलीला पाहून कोण आहे तू ? त्यावर त्या काळा सावलीने म्हटले की मी मृत्यू आहे ! मला माफ करा या गावांमध्ये मला ६०० व्यक्ती मारायचे आहे. तेव्हा साधू म्हटला जी तुझी मर्जी मृत्यू गावांमध्ये गेला १५ दिवसाच्या आत मध्येच ६०० नाहीतर ६००० व्यक्तींचा मृत्यू झाला.  साधू खूपच हैराण झाला. आणि ६०० म्हटले होते आणि ६००० मेले. मृत्यू परत जायला निघाली १५ दिवसानंतर तर साधू म्हटला की, थांब खोटारड्या ! मला खोटं बोलायचे काय गरज होती तू मला ६०० मारायचे आणि मारले ६००० त्यावर ,तो म्हणाला माफ करा. मी तर फक्त ६०० मारले उरलेले ५४०० तर भीतीनेच घाबरून मेले. मी नाही मारले ते तर दुसऱ्यांना मारताना पाहूनच मेली. जेव्हा महामारी असते ना तेव्हा सगळे  लोक महामारी ने नाही. मरत मरणाऱ्या लोकांनाच पाहून मारतात. आणि विचार करतात एवढे लोक मरतात तर मी कसा वाचणार मी पण मरणार. आणि एवढे लोक आजाराचा बळी पडलेले आहे आणि मी कसा वाचणार !

आता आपण गंमत पाहूया, डॉक्टर दिवसभर नुसता कामांमध्ये असतो. पेशंटला नीट करण्याच्या तरीपण तो नाही मरत तो तर आजारी आणि आजारामध्ये पडलेला असतो.  दिवसभर पेशंटमध्येच तरी डॉक्टरांना तो आजार नाही होत. आणि तुम्हाला काही वेळात आजारी पडतात त्याला म्हणतात च** आजार एकदम आजारी पडतात. आणि डॉक्टर दिवसभर त्या कोरोना पेशंटबरोबर असतो. पेशंटला तपासतो ,इंजेक्शन देतो. तरी त्याला काही होत नाही. आणि तुम्हाला हा आजार होतो रोग होतो याला कारण आहे. तुमचा भाव बस हीच गोष्ट आहे की, तुम्हाला आजारी पाडण्याची तुम्ही डॉक्टरांकडे पाहिलं तर तुम्हाला असे दिसेल की डॉक्टरांमध्ये त्यांच्या भावनेमध्ये खूप ताठरता किंवा सक्ती असल्याचं दिसतं. 

हेही वाचा ! कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी “या” दिवशी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश !

तुम्ही कितीही रडा, दुःखी वा तुमची बायको मरून द्या, आई-वडील मरून द्या, तरी डॉक्टरवर काही भावामध्ये बदल नाही. त्या डॉक्टरांना भावनाहीन व्हावे लागते. नाहीतर ते केव्हाचेच मेले असते. त्यांच्यासमोर रोजच कोणी ना कोणी मरत असते. येते का फक्त तुमचे तुमचेच आई वडील भाऊ बहीण बायको मुले असतात का? येथे तर खूपच रोगी येतात आणि त्यांची प्रत्येकानं बरोबर भावनिकता  सुरू केला तर, तो कधीच मरून जाईल. यामुळे त्यांचा जिवंत राहण्याचा एकच उपाय आहे ते म्हणजे ते भावनाहिन किंवा अप्रभावित पाहिजे. यामध्ये कोण मेले कोण जगले असं समजा तुम्ही एक पिक्चर किंवा फिल्म पाहत आहात. जर तुम्ही असा भाव ठेवला तरच तुम्ही जिवंत राहू शकता नाहीतर जिवंत राहू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पण कठोर बनणे गरजेचे आहे !

– प्रा. महेश देवकर

मानसशास्त्र विभागप्रमुख व

समुपदेशक मानसशास्त्र,

एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे 

maheshdeokarmd@gmail.com


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय