Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

कधी कधी दुष्काळ हा सुकाळ असतो. गरीबीतून पुढे न्यायला आपल्याला कारणीभूत ठरु शकतो – नरहरि झिरवाळ

---Advertisement---

सुरगाणा ता.२ (दौलत चौधरी) : कधी दुष्काळ हा सुकाळ असतो. गरीबीतून पुढे न्यायला आपल्याला कारणीभूत ठरु शकतो. कठोर परिश्रमाला जिद्द व चिकाटीची जोड दिली तर सुरगाणा तालुक्यात खेळाडूची खाण होऊ शकतो असे प्रतिपादन विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरि झिरवाळ यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, तालुका क्रीडा संकुल व सेवा सागर क्रीडा कला व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दिनेश पागी, यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित बिरसा मुंडा मॅरेथॉन स्पर्धा फिट इंडिया फ्रिडम रन २.० या आजादी का अमृत महोत्सवात  नुतन महाविद्यालय सुरगाणा येथे पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी केले. 

---Advertisement---

यावेळी व्यासपीठावर मांऊट एव्हरेस्ट शिखर सर वीर हेमलता गायकवाड, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू संजिवनी जाधव, दुर्गेश महाले, आमदार नितीन पवार, उपजिल्हाधिकारी डॉ. प्रकाश थविल, एन.डी. गावित, मोहन गांगुर्डे, चिंतामण गावित, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, प्राचार्य डॉ. प्रतापराव दिघावकर, आदिवासी बचाव अभियान सामाजिक कार्यकर्त्या सरोजताई भोये, रंजित गावित, रमेश थोरात, क्रीडा अधिकारी महेश पाटील, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार जिवा पांडू गावित, पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी झिरवाळ म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. कठोर मेहनत व सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते. बोगस आदिवासींना आपणच जबाबदार आहोत. राजकीय लोकांनी मतदानाकरीता बोगस नोंदणी केली. आपण आदिवासी आहोत अन् यापुढेही राहणार आहोत. कोणीही वाजायचे नाही, बुजायचे नाही. पेठ मधील शिवशेत आंबे येथील रमेश गायकवाड नावाचा एक युवक कठोर परिश्रम, जिद्द चिकाटी, मेहनतीच्या जोरावर पीएचडी करीता अमेरिकेला गेला अन् तेथून भगवा घालून आला. अमेरिकेत त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कुटुंबा सोबत जेवण करून आला आहे. अशी ही जिद्द चिकाटी असली पाहिजे.

या स्पर्धा ४ गटात घेण्यात आल्या, यामध्ये १२ वर्ष मुले, मुली १५  वर्षे, १८ वर्षे, खुला गट असे गट निहाय आयोजन करण्यात आले. यशस्वी विजेत्यांना ६० हजार रक्कमे पेक्षा पारितोषिक वितरण करण्यात आली. त्यामध्ये रोख रक्कम, प्रमाण पत्र, ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्रातील पाचशे पेक्षा जास्त खेळाडू मुलांनी सहभाग नोंदविला स्पर्धा विजेते खेळाडू नाव पुढील प्रमाणे…

– १२ वर्ष मुली आठशे मीटर : ललिता चोधरी, श्रेया जाधव, सायली गोमल, देवकी गायकवाड,

– 12 वर्ष मुले एक किलो मीटर करीता : करण गावित, तन्मय लोखंडे, सतीश पल्लवी, प्रभात पाडवी

– १५ वर्ष मुली दोन किलोमीटर : सकीला वसावे, साक्षी हाडोले, धनश्री होलगे, मनीषा पवार, 

– १५ वर्ष मुले तीन किलो मीटर : पृथ्वी राजभर, गणेश टारगे, पंकज होलगीज, प्रतीक जवळ

– १८ वर्ष मुली तीन किलो मीटर : तुळशी चोरे, वेदिका मंडलिक, जयश्री राऊत, साक्षी धपाटे

---Advertisement---

– 18 वर्ष मुले : आशिष जगताप, दीपक गायकवाड, रोहन पाल, आकाश लोटे

– खुला गट १० किलोमीटर : दयराम गायकवाड, रोहित यादव, दयानंद चैधरी, सुरेश झरे, रोहित झरे, रमेश गवळी आदी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. 

कार्यक्रमचे आयोजन सेवा सागर क्रीडा कला व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दिनेश पागी, हिरामण शेळके, धर्मेंद्र पगारीया, सेवानिवृत्त शिक्षक एन.एस चोधरी, निलेश जाधव, परशराम पाडवी, भागवत धूम, विलास पागी, अण्णा जाधव, रतन चौधरी, रामभाऊ थोरात, मोतीराम भोये, तुकाराम अलबाड यांनी केले. तर सूत्रसंचालन मोहपाडा येथील शिक्षक दीपक अहिरे यांनी केले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles