Thursday, January 23, 2025

बोनसबाबत सफाई कर्मचाऱ्यांमध्ये कही खुशी, कही गम – बाबा कांबळे

–  बोनस दिलेल्यांचे स्वागत तर न दिलेल्या ठेकेदाराचा आरोग्यकार्यलाया समोर निषेध

पिंपरी : महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व ठेकेदारांची बैठक घेऊन नियमानुसार दिवाळी बोनस देण्याच्या सूचना ठेकेदारांना केल्या होत्या. यापैकी काही ठेकेदारांनी यावर्षी दहा हजार रुपये बोनस दिला. तर काहींनी बोनस दिला नाही. त्यामुळे बोनसबाबत सफाई कर्मचाऱ्यांमध्ये कही खुशी कही गम असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. बोनस न देणाऱ्याविरोधात आगामी काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही बाबा कांबळे यांनी दिला.

यावेळी सफाई कामगार महिला संघटनेच्या कार्यकर्त्या मधुरा डांगे, रुक्मिणी कांबळे, मीन साळवे, सोनाली म्हेत्रे, ताराबाई प्रधान आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकामध्ये कंत्राटी पद्धतीने सोळाशे महिला व पुरुष रस्ते सफाई, झाडलोट व इतर कामे करत आहेत. दिवाळी निमित्ताने नियमानुसार मिळणारा बोनस दिला जात नाही. यामुळे सफाई कामगार कष्टकरी महिलांनी महापालिकेसमोर नुकतेच आंदोलन केले. यावेळी कांबळे बोलत होते.

बाबा कांबळे म्हणाले की, काही ठेकेदारांनी ४ हजार रुपये बोनस देण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलांनी तो बोनस नाकारला. किमान १० हजार रुपये बोनस द्या, अशी भूमिका महिलांनी घेतली. बोनस न दिल्यास उद्यापासून काम बंद आंदोलन करू अशी भूमिका महिलांनी घेतली आहे. अनेकांना बोनस मिळाला नाही. आयुक्त सकारात्मक आहेत. मात्र काही ठेकेदारांनी फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

यावेळी बोनस मिळालेल्या महिलांची भेट घेऊन त्यांच्यासोबत आनंद साजरा केला. तर ज्या महिलांना बोनस मिळाला नाही, त्यांच्यासोबत आरोग्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा आणि बोनस न देणाऱ्या ठेकेदाराचा निषेध करण्यात आला. 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles