Thursday, March 13, 2025

अकोले : युरीयाचा घोळ तात्काळ सोडवा अन्यथा आंदोलनाचा इशारा !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

राष्ट्रवादी पदवीधर संघाचे सुशीलकुमार चिखले यांचा इशारा

अकोले, दि. १८ : युरीयाचा घोळ तात्काळ सोडवा अन्यथा आंदोलनाचा करण्याचा इशारा राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुका अध्यक्ष सुशीलकुमार चिखले यांनी दिला आहे.

चिखले म्हणाले, की अकोले तालुक्यात युरीयाचे प्रचंड शॉर्टेज असूून शेतकरी खरीपाच्या तयारीला लागला असुन कामात व्यस्त आहे. परंतु शेतकऱ्यांना कृषीनिवीष्ठा मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. शेतकऱ्यांना ज्या वाणाचे बियाणे पाहिजे ते बियाणे उपलब्ध होत नसून बोगस कंपन्यांंचे बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारुन बियाणे उत्पादक कंपन्या व दुकानदार प्रचंड नफेखोरी करत असून शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिलेला नाही, असा आरोप ही करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर युरीया ऊपलब्ध होत नसुन त्यांची खताची मात्रा देऊन ऊस खत मातीआड करण्यासाठी ऊसाची सरी फोडणे, चारा पिक व इतर पिकांस नत्राची मात्रा देणे ही कामे वेळेत न झाल्यामुळे आता पावसाळा लागेल. ती कामे करता न आल्यामुळे व पिकाला युरीयाची मात्रा न मिळाल्यामुळे उभे पिकाचे नुकसान झाल्याचे चिखले यांनी म्हटले आहे.

अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना कृषी निवीष्ठा व मुख्यतः भात पिकासाठी निवाऱ्याला युरीयाचा साठा करुन ठेवने गरजेचे असते. कारण पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांचा बाजारपेठेंशी संपर्क तुटतो व पर्यायाने ते नंतर खत टाकत नाही व भाताचे ऊत्पादन कमी होऊन त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसतो. तसेच अकोल्याच्या पुर्व भागात विशेषतः मुळा आणि आढळा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली जाते. लोकांना ईगल या जातीचे सोयाबीन बियाणे मिळत नसून दुसऱ्या बोगस कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांना मोठी नफेखोरी करुन विकले जात असल्याचे ही म्हटले आहे.

कृषी विभाग व कृषी आधिकाऱ्यांना माहिती असूनही माहिती नसल्यासारखे करत आहेत. दुकानांत हजारो गोण्या युरीया शिल्लक असताना ते युरीया विक्रीसाठी परवानगी देत नसुन या विरोधात राष्ट्रवादी पदवीधर संघटना लवकरच युरीयाचा साठेबाजी विरोधात” आंदोलन छेडणार असल्याचे चिखले म्हणाले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles