Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणसामाजिक कार्यकर्ते किरण लोहकरे यांची पुणे विभागीय वनहक्क समितीच्या सदस्यपदी निवड

सामाजिक कार्यकर्ते किरण लोहकरे यांची पुणे विभागीय वनहक्क समितीच्या सदस्यपदी निवड

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पुणे, दि. २९ : तांबे गावचे सामाजिक कार्यकर्ते किरण यादव लोहकरे यांची पुणे विभागाच्या वनहक्क समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त यांनी याबाबतचा आदेश जारी केला असून नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले आहे. लोहकरे हे आदिवासी अधिकार मंचाचे कार्यकर्ते आहेत.

भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसुचीच्या परिच्छेद ५ च्या उप परिच्छेद (१) अन्वये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४४ च्या खंड (१) मध्ये महाराष्ट्र राज्याच्या नमुद अनुसुचित क्षेत्रासाठी जाहिर केलेल्या अधिसुचनेनुसार, अनुसुचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहक्कांची ची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम २००८ आणि सुधारीत नियम, २०१२ अंतर्गत जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजुर केलेल्या अनुसुचित क्षेत्रातील वनहक्क अपिलांच्या दाव्यांवर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय वनहक्क समिती स्थापन करण्यात आलेली असुन सदर विभागीय वनहक्क समितीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.  

किरण लोहकरे यांना मंत्रालयात आदिवासी विभागात पेसा व वनहक्क कायद्याबाबत कामकाजाचा अनुभव असल्याने व गाव स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत ची वनहक्क दाव्याबाबत ची प्रक्रिया माहीत असल्याने विभागीय समितीवर अभ्यासू व्यक्तीची निवड झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या समितीचे अध्यक्ष पुणे विभागीय आयुक्त असून सचिव एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आहेत.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय