Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडSitaram Yechury : देशाने एक विद्वान राजकारणी गमावला - मानव कांबळे

Sitaram Yechury : देशाने एक विद्वान राजकारणी गमावला – मानव कांबळे

पिंपरी चिंचवड : कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील विविध पुरोगामी, डाव्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Sitaram Yechury)

मानव कांबळे
अध्यक्ष – स्वराज्य अभियान महाराष्ट्र

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव कॉम्रेड सिताराम येचुरी यांचे गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी निधन झाले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एस एफ आय या विद्यार्थी संघटनेच्या कामापासून आपल्या सार्वजनिक आयुष्याला सुरुवात करणारे मार्क्सवादी व समाजवादी विचारांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेले नेते सिताराम येचुरी हे अतिशय विद्वान आणि आपल्या तत्वांशी कधीही तडजोड न करणारे नेते म्हणून प्रसिद्ध होते. (Sitaram Yechury)

सर्वसामान्य कार्यकर्त्याशीही अतिशय आपुलकीने संवाद करणे व सोप्या आणि सरळ भाषेमध्ये राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करणे यामध्ये त्यांचा हातखंडा होता. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये त्यांना दोन वेळा निमंत्रित केले होते तेव्हा त्यांचा जवळून परिचय झाला होता. राज्यसभेतील त्यांची अनेक भाषणे सरकारला विचार करायला प्रवृत्त करणारी ठरली. (Sitaram Yechury)

त्यांच्या आकस्मित जाण्याने डाव्या आणि समाजवादी चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या विद्वत्तापूर्ण मार्गदर्शनाला देश आता मुकलेला आहे. अशा या विद्वान व डाव्या विचारांच्या प्रगल्भ नेत्याला “स्वराज अभियान’ महाराष्ट्राच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व अखेरचा लाल सलाम

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय