Monday, October 7, 2024
HomeराजकारणSitaram Yechury : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन

Sitaram Yechury : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन

Sitaram Yechury : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे गुरुवारी (१२ सप्टेंबर) निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.

मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. न्यूमोनियामुळे छातीत संसर्ग होऊन श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना १९ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सीताराम येचुरी (Sitaram Yechury) हे डाव्या चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. १९७४ साली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी एका वर्षातच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) मध्ये प्रवेश केला. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) शिक्षण घेत असताना आणीबाणीच्या काळात अटकही भोगली.

Sitaram Yechury

येचुरी यांनी १९७७ ते १९८८ या कालावधीत तीन वेळा जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. प्रकाश करात यांच्यासोबत त्यांनी जेएनयूमध्ये डाव्या विचारधारेची मजबूत पायाभरणी केली.

१९९६ मध्ये पी. चिदंबरम यांच्यासह त्यांनी संयुक्त आघाडी सरकारसाठी समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला. तसेच २००४ च्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय