Sunday, July 14, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी-चिंचवड, पुणे मंडळाचा एक दिवशीय कार्यकर्ता शिबिर संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी-चिंचवड, पुणे मंडळाचा एक दिवशीय कार्यकर्ता शिबिर संपन्न

पिंपरी चिंचवड : सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने  नुकतेच हॉटेल वी, टेल्को रोड, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराची सुरुवात आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आली. 

यावेळी पिंपरी चिंचवड कॉग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष, कोकण महाविकास संघाचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी सत्तारूढ पक्षनेते, नगरसेवक एकनाथ पवार व  कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंचाचे संस्थापक यशवंत कण्हेरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी मंडळाचे संस्थापक व मंडळाच्या कार्यकारीणीच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या शहरातील साडेतीन हजार सभासदांचे नेतृत्व करणारे १७ विभागातून निवडक १०० कार्यकर्ते उपस्थित होते. 

सध्याची मंडळाची परिस्थिती मंडळाच्या संलग्न संस्था सिंधु लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, सिंधु स्वयंवर वधू वर सूचक मंडळ, नाट्य सिंधू, भजन सिंधू, युवा सिंधू , आपदग्रस्त विभाग, या सलग्नसंस्थेचा आढावा तसेच भविष्यातील मंडळाची वाटचाल याकरिता संपूर्ण एक दिवसाच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी सांगितले तर माजी अध्यक्ष दादा गावडे यांनी कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवत मंडळाची ४४ व्या वर्षात यशस्वी वाटचाल होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

तणावमुक्ती या विषयावर हजारो अधिक व्याख्याने दिली ते अशोक देशमुख यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन दिले. ऍड. चंद्रकांत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन संतोष साटम यांनी केले तर आभार परशुराम प्रभू यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय