Friday, April 19, 2024
Homeजिल्हासिंधुदुर्ग : सिटूचा आशा व गटप्रवर्तक देशव्यापी संप यशस्वी - विजयाराणी पाटील

सिंधुदुर्ग : सिटूचा आशा व गटप्रवर्तक देशव्यापी संप यशस्वी – विजयाराणी पाटील

सिंधुदुर्ग : देशभरातील सर्व योजना  कर्मचाऱ्यांचा 24 सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संप यशस्वी पार पडला, असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन सिटू संलग्न च्या जिल्हा सचिव विजयाराणी पाटील यांनी दिली.

आशा वर्कर्स, गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण कर्मचारी यांच्या संघटनांनी हा संप पुकारलेला होता. सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन च्या सर्व आशा व गटप्रवर्तक या आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व आशा गटप्रवर्तक आपापल्या प्राथमिक आरोग्य केंद्र समोर जमून निदर्शने केली व शेवटी आपल्या मागण्यांचे निवेदन वैद्यकीय अधिकारी यांना दिले. 

आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय आरोग्य कर्मचारी म्हणून कायम करा, किमान वेतन कायद्यानुसार दरमहा आशाना 18000 रुपये  व गटप्रवर्तक यांना 22000 रुपये वेतन सुरू करा, रजा, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड इ. सामाजिक सुरक्षा लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी हा संप करण्यात आलेला होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय