श्रीगोंदा ( अहमदनगर ) : आज दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी तालुका श्रीगोंदा पारगाव शिद्री येथे नामदार बच्चू कडू राज्य मंत्री व प्रहार जनशक्ती संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व गौरव जाधव राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती व नयन पुजारी रूग्ण सेवक महाराष्ट्र राज्य व प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक आरोग्य कोठी व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रुप जुन्नर तालुका व स्पार्क मिंन्डा फाउंडेशन चिंबळी पुणे तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग जनजागृती अभियान चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, निराधा व जेष्ठ नागरिकांना यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी व स्पार्क मिंन्डा फाउंडेशन चिंबळी यांच्या कडून दिव्यांग व जेष्ठ नागरीक यांना मोफत साहित्य वाटप पुर्व तपासणी करून येत्या 24 डिसेंबर ला साहित्य वाटप करणार आहेत. दिव्यांग व जेष्ठ नागरीक यांनी संघटना कडे नावनोंदणीची करून घ्यावी, असेही सांगण्यात आले.
यावेळी स्पार्क मिंन्डा फाउंडेशन चे डाॅ.निलेश पवळे, डाॅ.योगीता मडकईकर, डाॅ. कीर्ती दौंडकर, अकबर शेख, अमोल खंडागळे यानी दिव्यांग व जेष्ठ नागरीक यांची आवश्यक साहित्य वाटप पुर्व तपासणी करून घेतली. तसेच दिव्यांग वय 18 ते 30 वयोगटातील व युवक, युवतींना प्रथम एज्युकेशन फाउंडेशन शिरूर यांच्या कडून मोफत प्रशिक्षण व रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वेल्डर, प्लंबर, हाॅटेल मॅनेजमेंट, ब्युटी पार्लर, ऑटोमोबाईल, वेबसाईट असिंस्टन्ड, नर्सिंग कोर्स मोफत देणार असून अनेक बेरोजगारांनी प्रशिक्षण करीता नाव नोदणी करून घेतली.
या वेळी प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक (अयोग्य कोठी ) व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य च्या वतीने शासनाच्या विविध योजना याची माहिती दिली व नाव नोदणी करून घेतली. या वेळी दिव्यांग व जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष माऊली हिवरे, गीताई फार्मस प्रोडूसर कंपनी चे चेअरमन बाळासाहेब काळे, पारगाव चे सरपंच बबनराव बोडके, उपसरपंच रवींद्र मोठे, सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम जगताप, दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष राजेंद्र पोकळ, सुरेश गलांडे, नवनाथ जाधव, धनश्री नवनाथ जाधव, मनोहर कडाळणे, अरविंद नरसाळे पारनेर तालुका अध्यक्ष, अरूण शेरकर अध्यक्ष, सौरभ मातेले, ज्ञानदेव बांगर, मंगेश भुजबळ, विनायक शिंदे लक्काभाई, युवक, युवतींना मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर श्रीगोंदा विभाग चे संजय जठार व गणेश गोसावी यांचे व प्रहार रूग्ण सेवक आरोग्य कोठी व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी दिव्यांग व जेष्ठ नागरीक व बेरोजगार युवक युवतीं उपस्थित होते यावेळी नवनाथ जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.