Sunday, March 16, 2025

… ५ लाख किलोचे स्पेस स्टेशन चीन किंवा भारतावर पाडायचे का? रशियाचा अमेरिकेला इशारा

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला करताच अमेरिकेने नाकाबंदी करण्यास सुरुवात केली. रशियावर व्यापारी, तंत्रज्ञान आदी गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावर रशियाची स्पेस एजन्सी रॉसकोमोसचे प्रमुख दिमित्रि रोगोजिन यांनी अमेरिकेला थेट आव्हान देत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक चीन किंवा भारतावर पाडायचे का? असा इशाराच रशियाने दिला आहे.

रॉसकोमोसचे प्रमुख दिमित्रि रोगोजिन यांनी ट्विट करत म्हटलं आहे की “जर तुम्ही आमच्यासोबतच्या सहकार्यावर निर्बंध आणले तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला वाटेल त्या भ्रमणकक्षेत फिरण्यापासून कोण वाचवणार. ते अमेरिका किंवा युरोपमध्ये पडणार नाही का?”, असा प्रश्न दिमित्रि रोगोजिन यांनी उपस्थित केलाय. अमेरिकनं निर्बंध लादल्यानंतर लगेच दिमित्रि रोगोजिन यांनी हे ट्विट केले.

रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्य तेलाचे भाव वधारले

“या” राज्याचे अधिवेशन मध्यरात्री २ वाजता होणार, देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरणार

“त्याचप्रमाणे ५०० टन (५ लाख किलो) वजनाची ही वस्तू भारत किंवा चीनवर पाडण्याचाही पर्याय आहे. तुम्हाला या शक्यतेने त्यांना धमकवायचे आहे का? आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन रशियावरुन जात नाही, त्यामुळे सर्व धोका तुम्हालाच आहे. तुम्ही त्यासाठी तयार आहात का?,” असंही दिमित्रि रोगोजिन सवाल केला आहे.

या ट्विट वारनंतर नासाला पुढं यावं लागलं आहे. नासाने म्हटलं आहे की, अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा अंतराळ मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.

इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles