Thursday, July 18, 2024
Homeताज्या बातम्याधक्कादायक : भगोरिया जत्रेत भररस्त्यात पुरूषांच्या टोळीकडून तरुणीवर अत्याचार, १५ जण ताब्यात

धक्कादायक : भगोरिया जत्रेत भररस्त्यात पुरूषांच्या टोळीकडून तरुणीवर अत्याचार, १५ जण ताब्यात

अलीराजपूर : मध्य प्रदेशातील आदिवासीबहुल अलीराजपूर जिल्ह्यात भरदिवसा रस्त्यात महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 15 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर या घटनेचा व्हिडिओ बनवून व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

अलीराजपूर जिल्ह्यातील वालपूर गावात आदिवासी सण भगोरिया साजरा होत असताना काही लोकांनी महिलांवर अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील पुरुषांचा एक गट दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचार आणि लैंगिक छळ करताना दिसत आहे. यावेळी आरोपींना थांबवण्याऐवजी जमाव हसताना दिसत आहे. त्यांना कोणीही अडवले नाही. तर काही लोक या घटनेचा व्हिडिओ करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे त्या व्यक्तींवर पोलीसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली असून या घटनेत 15 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या संदर्भात कोणत्याही महिलेकडून कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

अलीराजपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज सिंह यांनी रविवारी सांगितले की, “आम्ही या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे तिघेही महिलांसोबत गैरवर्तन करताना दिसत आहेत. आम्ही व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय