चंदिगड : मोहालीच्या चंदिगड विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंदिगड विद्यापीठातील मुली आंघोळ करतानाचा न्यूड व्हिडिओ बनवून तो इंटरनेटवर व्हायरल केल्याचा संपातजनक प्रकार समोर आला आहे.
चंदिगड विद्यापिठातील मुलींच्या वसतीगृहातील एका मुलीनं आपल्या सहकारी विद्यार्थींनीचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून हे व्हिडिओ ती शिमल्यातील एका मुलाला पाठवत असे. तिने व्हिडिओ एक दोन नव्हे, तर तब्बल ६० विद्यार्थींनीचे व्हिडिओ तिनं रेकॉर्ड केले होते. संबंधित मुलगा हे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करत होता. हे धक्कादायक प्रकरण समोर आल्याने विद्यापीठात एकच खळबळ उडाली. मध्यरात्री जवळपास अडीच वाजता काही विद्यार्थीनी युनिव्हर्सिटीच्या गेटजवळ पोहोचल्या आणि जोरजोरदात घोषणाबाजी केली.
चंदीगढ विद्यापिठातील वातावरण तापल्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास पोलीस दाखल झाले. विद्यार्थ्यांनी रागाच्या भरात मुली पोलिसांवरही आवाज चढवला. सध्या विद्यापिठाच्या कॅम्पसमधील वातावरण तणावपूर्ण आहे. या प्रकरणाबाबत आरोपी विद्यार्थीनीची ओळख पटवण्यात आली आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या विद्यार्थीनीने आपला गुन्हा कबूल केला असून खूप आधीपासूनच व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचं तिनं मान्य केलं आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करत आहेत.
विद्यापीठातील ६० विद्यार्थीनींचा न्यूड व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात आल्याचे समजताच ८ विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. मात्र, कोणत्याही विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेला नाही, असे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणाले आहेत. केवळ एक विद्यार्थिनी बेशुद्ध झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय एमएमएस बनवणाऱ्या आरोपी विद्यार्थिनीलाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती सायबर क्राइम ब्रँचला देण्यात आली असून, आता आरोपीची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांनी ट्विट करून विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. दोषींना कडक शासन करण्यात येईल. हे प्रकरण फार संवेदनशील आहे. आमच्या भगिनी आणि मुलींच्या चारीत्र्याचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रीया दिली आहे.