Saturday, December 7, 2024
HomeNewsधक्कादायक: पुण्यातील ससून रुग्णालयात नंग्या तलवारी आणि रक्ताचा थरकाप उडवणारा गोळीबार !

धक्कादायक: पुण्यातील ससून रुग्णालयात नंग्या तलवारी आणि रक्ताचा थरकाप उडवणारा गोळीबार !

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या कैदी वार्डमध्ये घुसून हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर गोळीबार आणि तलवारीने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील ससून रूग्णालयाच्या कैदी वॉर्डमध्ये सोमवारी रात्री हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तुषार हंबीर हा कुख्यात गुन्हेगार असून गेले काही वर्ष तो तुरूंगात आहे मात्र दहा दिवसांपूर्वीच त्याची तब्येत बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात कैदी वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं. सोमवारी रात्री नातेवाईक असल्याचं भासवून दोन जण कैदी वॉर्डमध्ये शिरले आणि हंबीर यांच्यावर गोळीबार केला आणि सोबत आणलेल्या तलवारी ने वार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी अमोल बागड यांनी विरोध केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत बागड जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. बंडगार्डन पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे मात्र अजून हल्लेखोरांना पोलीस पकडू शकलेले नाहीत.

सोर्स : न्यूज 18 लोकमत

संबंधित लेख

लोकप्रिय