Wednesday, August 17, 2022
Homeजिल्हाधक्कादायक : पोलिस अधिकाऱ्यानेच केला बलात्कार !

धक्कादायक : पोलिस अधिकाऱ्यानेच केला बलात्कार !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पुणे / रवींद्र कोल्हे : “काही दिवसांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी घटना वाढत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनात सातत्याने वाढ होत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी शहरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली त्यामुळे पुणे शहर पुरते हादरले होते. पोलिसांपुढे गुन्हेगारांनी मोठं आवाहन उभं केलं असता, पुण्याला हहादरवून सोडणारीआणखी एक घटना शहरात घडली.

ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी, ज्यांच्या विश्वासावर बिनधास्त अवलंबून रहातो, त्यांनीच एका अबलेवर अतिप्रसंग केला असल्याची फिर्याद पीडित तरुणीने कोथरूड पोलिस ठाण्यात दिली आहे.

कोथरूड शिवारात एका पोलिस अधिकाऱ्याने २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात पोलिस उप निरीक्षक प्रवीण नागेश जर्दे या पोलिस अधिकाऱ्या विरोधात पीडित तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. जर्दे हे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून,येरवडा पोलिस वाहतूक विभागात पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करीत आहेत. जर्दे यांनी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पुणे आणि शहरात विविध ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार केला. तसेच जर्दे यांचे पाहिले लग्न झाल्याचेही त्यांनी तरुणीपासून लपवून ठेवले, असेही तरुणीने कोथरूड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

तरुणीने जर्दे यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता, तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. जर्दे हे सन २०१८ मध्ये कोथरूड पोलिस ठाण्यात कार्यरत असतांना त्यांची एका प्रकरणाचा तपास करतांना तत्कालीन आरोपीच्या बहिणीशी ओळख झाली. त्यानंतर आपलं पहिलं लग्न झाल्याचं लपवून ठेवत आरोपी जर्दे याने तिच्याशी जवळीक वाढविली. त्यानंतर अति जवळीक लग्नाचे अमिश दाखविले गेले. त्यानंतर जर्दे यांनी लग्नाचे अमिश दाखवून सातत्याने बलात्कार केला. त्यानंतर पोलिस खात्याचा धाक दाखवत माझं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही.असे म्हणत फिर्यादी तरुणीलाच जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली.

पीडित तरुणीने दाखल केलेल्या फिर्यादीवरून जर्दे यांचेवर बलात्कार आणि धमकावणे यांसह विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस अधिक तपास करीत आहेत.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय