Saturday, April 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयधक्कादायक : प्राथमिक शाळेत अंदाधुंद गोळीबार १९ विद्यार्थ्यांसह २१ जण ठार

धक्कादायक : प्राथमिक शाळेत अंदाधुंद गोळीबार १९ विद्यार्थ्यांसह २१ जण ठार

ह्युस्टन : अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील उवाल्डे या शहरातील प्राथमिक शाळेत अंदाधुंद गोळीबारात १९ विद्यार्थ्यांसह २१ जण ठार झाल्याने संपुर्ण अमेरिका हादरली आहे. 

मंगळवारी सकाळी एका १८ वर्षे वयाच्या माथेफिरूने शाळेत घुसून गोळीबार केला या गोळीबारात १९ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.  यात दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गात  शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जखमी विद्यार्थ्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत हल्लेखोर ठार झाला. या हिंसेमुळे अमेरिकेत प्रचंड दहशत पसरली असून देशात चार दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

धक्कादायक म्हणजे माथेफिरूने हल्ला करण्याआधी स्वतःच्या आजीची गोळ्या झाडून हत्या केली. तसेच हा हल्ला करण्याच्या अर्धा तास आधी त्याने इन्स्टाग्रामला दोन रायफलसह पोस्ट टाकली होती. त्याच्या या हिंसक कृत्यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पाेलीस याचा तपास करत आहेत.

दरम्यान, या हत्याकांडाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी अमेरिकेतील सरकारी, लष्करी इमारती, युद्धनौका यांच्यावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आले होते. या संदर्भातील वृत्त एका इंग्रजी माध्यमाने दिले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय