Wednesday, February 5, 2025

धक्कादायक : दिवसा ढवळ्या पुण्यातील रस्त्यावर तरूणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

पुणे : पुण्यातील दर्शना पवारच्या हत्येची घटना ताजी असतानाच आज दिवसा ढवळ्या पुण्यातील रस्त्यावर एका तरूणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील सदाशिव पेठेत पेरूगेट पोलीस चौकीजवळ तरूणीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील हा परिसर नेहमीच वर्दळीचा असतो, असे असताना त्याठिकाणी हल्लेखोर तरूण आला. त्यावेळी तरूणीवर हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला करण्यास सुरूवात केली. परंतु त्याठिकाणाहून तरूणीनी पळ काढल्याने तिचा जीव वाचला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय 21) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, संबंधित घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे, पीडितेवर रूग्णालयात उपचार सुरू असून सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात येईल, पुणे पोलिस आयुक्त वैयक्तिक तपासात लक्ष देत असून, घटनेचा सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना आयोगाच्या वतीने दिल्या आहेत. आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहोत, असे चाकणकर यांनी ट्वीट केले आहे.

हे ही वाचा :

कृषी पदवीधरांसाठी खुशखबर : राज्यात कृषी सेवकांच्या 2 हजार 588 जागा भरणार

नवीन भरती : ठाणे महानगरपालिका अंतर्गत ‘इंन्टेन्सिव्हिट’ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NMMC : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘योग प्रशिक्षक’ पदासाठी भरती

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक व अन्य पदांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles