नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी १ सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत, त्यामुळे व्यावसायिकांना पुन्हा एक झटका बसला आहे. दिल्लीमध्ये १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) किंमतीत ३९ रुपयांची वाढ झाली असून, आता याची किंमत १,६९१.५० रुपये झाली आहे. यापूर्वी हा दर १,६५२.५० रुपये होता.
इतर शहरांमध्येही दर वाढले आहेत. कोलकाता येथे १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १,८०२.५० रुपये झाली आहे, जी पूर्वी १,७६४.५० रुपये होती. मुंबईत हा दर १,६४४ रुपये झाला आहे, जो यापूर्वी १,६०५ रुपये होता. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १,८५५ रुपये झाली असून, ती पूर्वी १,८१७ रुपये होती. इंडियन ऑईल कंपनीच्या एलपीजी गॅससाठी हे दर लागू आहेत. (Gas cylinder)
याआधीच्या महिन्यांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत काही घट झाली होती, ज्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. जुलैमध्ये प्रति सिलिंडरची किंमत ३० रुपयांनी कमी झाली होती, तर जूनमध्ये ६९.५० रुपये आणि मेमध्ये १९ रुपयांची घट झाली होती. मात्र, १ सप्टेंबरपासून ही दरवाढ पुन्हा झाली आहे.
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये १४.२ किलो वजनाचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर ८०३ रुपयांना उपलब्ध आहे. कोलकाता येथे हा दर ८२९ रुपये आहे, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहे. गेल्या वर्षी याच काळात दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९०३ रुपये होती, जी आता ८०३ रुपये आहे.
हेही वाचा :
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी
Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती