Saturday, October 5, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : एसटी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी' सेवा ; प्रवाशांना ‘हवाई सुंदरी’ सेवेसारखी...

मोठी बातमी : एसटी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ सेवा ; प्रवाशांना ‘हवाई सुंदरी’ सेवेसारखी सुविधा

Shivneri Bus Hostesses  :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच ईलेक्ट्रिक बसमध्ये हवाई सुंदरीप्रमाणे बस सुंदरी असणार, असं वक्तव्य केलं होतं. याबाबत महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ असणार आहे. शिवसेना नेते भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी या निर्णयाची घोषणा केली.

एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमधील प्रवाशांना आता हवाई सुंदरीप्रमाणे ‘शिवनेरी सुंदरी’ या खास बस होस्टेसची सेवा मिळणार आहे. शिवसेना नेते आणि एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावले यांनी याबाबत घोषणा केली आहे. हवाई सेवेसारखेच दर्जेदार आदरातिथ्य प्रवाशांना मिळावे, यासाठी ही अभिनव अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये ही सेवा प्रवाशांना देण्यात येणार आहे. खास करून तिकिटांवर कोणताही अतिरिक्त अधिभार न लावता, प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा सुविधा देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या 304 व्या बैठकीत हा निर्णय घोषित केला. 

याचसोबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ राज्यातील 343 एसटी बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ सुरू करण्याची योजना आहे. या केंद्रांमध्ये कमी दरात आरोग्य तपासण्या, औषधं आणि विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. 

एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याची योजना देखील मंजूर झाली आहे. 

महामंडळाने यावेळी 2500 नवीन साध्या बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली आहे, तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

Shivneri Bus Hostesses 

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी

दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम

महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल

मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू

भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

संबंधित लेख

लोकप्रिय