हडपसर / डॉ. अतुल चौरे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दि.२२ ते २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, नागपुर’ येथे आयोजित केलेल्या ‘पश्चिम विभागीय-२०२३’ या युवक महोत्सवात एस. एम. जोशी महाविद्यालयातील S.Y.BSc. या वर्गातील कु.शिवानी वाघ हिने वेस्टन सोलो सॉंग या प्रकारात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. Shivani wagh from S M Joshi College stands first in Western Regional Youth Festival
त्यामुळे तिची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यापूर्वी तिने युवक महोत्सव आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये व विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर तिची निवड पुणे विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल संघात झाली होती.
तिने मिळविलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी तिचे अभिनंदन करीत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिने मिळविलेल्या यशामध्ये सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.शिल्पा शितोळे, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, सांस्कृतिक समितीमधील सर्व सदस्य, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांचे योगदान आह़े.