कोल्हापूर : अठरा पगड जाती अन् बारा बलुतेदार यांच्यात विभागलेल्या रयतेला स्वराज्य ह्या एका महत्वाच्या संकल्पनेत ओवणारे शिवचरित्र म्हणजे जातीअंतची विचारधारा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे यांनी केले.
निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, सत्यशोधक इतिहास परिषद, गरुडभरारी एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते बसवंताप्पा उबाळे हे होते.
विशेष लेख : शिवाजी महाराज आज असते तर !
ह्यावेळी बोलताना डॉ. वाघमारे यांनी अनेक दाखले देत परखड शब्दांत शिवचरीत्र आणि जातीअंत या विषयावरील विचार विशद केले. जेष्ठ कायदेतज्ञ ॲड. मंचकराव डोणे, ज्येष्ठ नेते अब्राहम आवळे, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, प्रा. शोभा चाळके, ॲड. करुणा मिणचेकर, चंद्रकांत सावंत, लोकराज्य जनता पार्टीचे अनिल चव्हाण, प्रा. टी. के. सलगर, सिद्धार्थ कांबळे, विमल पोखर्णीकर, ॲड. अधिक चाळके, ॲड. अतुल जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी ह्यावेळी उपस्थित होते.
शिवचरित्र घराघरात पोचवणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा सन्मान या निमित्ताने केला जात आहे. दुसऱ्या सत्रात संभाजी ब्रिगेडचे नेते बाळासाहेब पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्वागत प्रास्ताविक चंद्रकांत सावंत यांनी केले, आभार डॉ. दयानंद ठाणेकर यांनी मानले.
देशातील सर्वात तरूण महापौर करणार आमदारासोबत लग्नं