Wednesday, February 5, 2025

नारायण राणे यांचे विरोधात भोसरीत शिवसेनेचे आंदोलन

भोसरी : आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर अर्वाच्च भाषेत केलेल्या टिके विरोधात शिवसैनिकांनी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याकडे नारायण राणे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

हे पण वाचा ! पिंपरी चिंचवड : दिव्यांगांचे पोलिसांसोबत रक्षाबंधन !

यावेळी शिवसेनेच्या वतीने ‘कोंबडीचोर नारायण राणे’ अशा घोषणा कोंबडी दाखवून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख निलेश मुटके, कामगार नेते इरफान भाई सय्यद, संघटक तुषार सहाने, युवासेना जिल्हाधिकारी सुरज लांडगे, उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, राहुल गवळी, कुणाल तापकीर, परशुराम अल्हाट, राहुल भोसले, रावसाहेब थोरात, दादा नरळे, विश्वनाथ टेमगिरे आणि संदीप टोके, प्रदीप चव्हाण, नितीन बोंडे, राजेंद्र खोसे, विशाल लांडगे, कैलास नेवासकर, दत्ता भालेराव, संतोष वरे, राहुल गरड, किशोर सवाई, अमित शिंदे, शरद हुले, गौरव असरे, राहुल पिंगळे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles