Wednesday, February 5, 2025

शिवसेना शहर प्रमुखच चालवतोय मटका जुगार, पोलिसांनी रेड टाकून करून केली कारवाई !

आंबेगाव : घोडेगाव पोलिसांनी मटक्याच्या धंद्यावर कारवाई केली असून यात बड्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. 

घोडेगाव गावच्या हद्दीमध्ये मंचर – भीमाशंकर रोडच्या कडेला डोंगरे हॉस्पिटलमागील मोकळ्या मैदानामध्ये झाडाच्या आडोशाला बसलेल्यांंवर ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा ! जुन्नर : ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी रत्नाकर आवटे यांची बिनविरोध निवड !

यामध्ये एकूण तीन आरोपींंविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून अंदाजे १६ हजार रुपये, मोटारसायकल, मोबाईल, मटक्याचे साहित्य असे एकूण ५८ हजार १३० रुपयाचा मुद्देमाल घोडेगाव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

यामध्ये जगन महादु आसवले रा.कोटमदरा, ता.आंबेगाव, सोमनाथ तुकाराम बांबळे रा. बोरघर उंबरवाडी, सध्या घोडेगाव या दोघांना कल्याण मटका चालवताना रंगेहाथ पकडले. तपासाअंती हे दोघे घोडेगावचे माजी उपसरपंच व विद्यमान घोडेगाव शिवसेना शहर प्रमुख तुकाराम नामदेव काळे रा. घोडेगाव यांच्या सांगण्यावरून कल्याण मटका जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले.

हेही पहा ! जुन्नरमध्ये मजुरांच्या कायदेशीर हक्कांना हरताळ, प्रशासनाला जाब विचारण्यासाठी किसान सभेचा एल्गार !

तुकाराम काळे यांच्याविरोधात पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 


Related Articles

- Advertisement -

Latest Articles