पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१९-डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया(DYFI) पिंपरी चिंचवड शहर समिती व सावित्रीबाई फुले व जिजामाता महिला बचत गट तर्फे दत्तवाडी, आकुर्डी येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नागरिक नारायण कातळकर यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास हार घालण्यात आला.
सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुलभा पाचभाई मॅडम यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला.जिजामाता महिला बचत गटाच्या अध्यक्षा गुलनाज शेख यांनी महाराजांवर माहिती दिली.
अॅड.अमिन शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सूत्र संचालन देवीदास जाधव यांनी केले तसेच मंगेश कुटे,पूजा घाडगे,गौरव पानवलकर,मनोज शिंदे,आफरीन शेख, अमोल कुऱ्हाडे, दिपक शिंदे, प्रसाद जगताप या सर्वांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.
---Advertisement---