Wednesday, September 18, 2024
Homeबॉलिवूडशिबानी दांडेकरने फरहान अख्तर सोबत घातला लग्नाचा घाट.!

शिबानी दांडेकरने फरहान अख्तर सोबत घातला लग्नाचा घाट.!

 

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार हे विवाह बंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. बॉलिवूडमधली जोडी विकी-कतरिनाचा शाही विवाह सोहळा पार पडला. आता लवकरच प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या 21 फेब्रुवारी रोजी फरहान आणि शिबानी कोर्ट मॅरेज करणार आहेत.

पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेज झाल्यानंतर ते रिसेप्शनचा कार्यक्रम पार पडेल असं म्हटलं जात आहे. 

व्हिडिओ : ‘या’ अभिनेत्रीने केला मुंबईच्या रस्त्यावर कचरा डान्स. जरूर पहा !

फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट घेतला. अधुना आणि फरहाननं 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती.

वृत्तानुसार, हा एक अतिशय खाजगी लग्नसोहळा असेल. हे लग्न शनिवारी फरहान अख्तरच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर होणार आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांना हे लग्न अत्यंत गुप्त ठेवायचं आहे. 

व्हिडिओ : नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट झुंड 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला! Jhund (Teaser)

कोणत्याही मीडियाला या ठिकाणाची माहिती मिळावी असं कुटुंबीयांना वाटत नाही. लग्नासाठी केवळ कुटुंबातील सदस्यांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे. प्रत्येक माहिती गोपनीय ठेवली जात असली तरी मराठी चालीरितींनुसार दोघं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा

एका रात्रीत बदलले ६० वर्षीय मजुराचे नशीब !

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !

संबंधित लेख

लोकप्रिय