Saturday, October 5, 2024
Homeताज्या बातम्याAkshay Shinde : आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या दोन्ही पोलिसांना, शर्मिला ठाकरे...

Akshay Shinde : आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या दोन्ही पोलिसांना, शर्मिला ठाकरे यांच्याकडून 51 हजारांचे बक्षीस जाहीर

Akshay Shinde : बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी घटनेचे समर्थन करत, “आरोपीने तीन-चार वर्षांच्या मुलीवर हात टाकताना मागेपुढे पाहिले नाही. योग्य तो न्याय मिळाला आहे,” असे वक्तव्य केले. 

याशिवाय, शर्मिला ठाकरे यांनी आरोपीला ठार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना 51 हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. पैसे महत्त्वाचे नाहीत, परंतु याचं उत्तर असंच दिलं गेलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.

घटना घडली तेव्हा अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला नेले जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रवासादरम्यान अक्षयने पोलिस कॉन्स्टेबलची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला, ज्यात एपीआय निलेश मोरे यांना गोळी लागली. यानंतर मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली, सोमवारी सायंकाळी 6.30 च्या आसपास   पोलिसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. त्यावेळी ही घटना घडली. पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या गोळीबारामुळं जखमी झालेल्या अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी अक्षय शिंदेला मृत घोषित केलं.

जखमी झालेल्या एपीआय निलेश मोरेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या एन्काऊंटरच्या पार्श्वभूमीवर संजय शिंदे, ज्यांनी पूर्वी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे.संजय शिंदे यांनी यापूर्वी मुंबई पोलिसातही काम केले आहे. सध्या ते बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) भाग आहे.

Akshay Shinde

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले

गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज

जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा

पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ

उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ

संबंधित लेख

लोकप्रिय