मुंबई : राज्यातील देवस्थाने का सुरू करत नाही असा आशयाचे पत्र राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काल पाठविण्यात आले होते. ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचण्या आधीच मिडियामध्ये राज्यपालांकडून पोहोचवले गेले. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरूद्ध वापरलेली भाषा सर्वाधिक उर्मट असल्याचे समोर येते आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी झटणारे होता. अयोध्येला मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही भेट दिली. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा ही केली. परंतु, आता मंदिरे चालू करू नका, म्हणू देवांकडून तुम्हाला संदेश येतो आहे की काय? का तुम्ही धर्मनिरपेक्ष झाले? असा उर्मट सवालच राज्यपालांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला गेला आहे. याविषयी राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आक्षेप नोंदविला आहे.
या पत्रात शरद पवारांनी केंद्र सरकार राबवत असलेल्या ” दो गज की दुरू उपक्रम” कोरोनाबाबत जागृती करत आहे. महाराष्ट्र सरकार ही माझे कुटूंब माझी जबाबदारी उपक्रम राबवत असल्याचे ही मोंदींना सांगितले. परंतु, महाराष्ट्रातील कोरोना प्रार्दुभाव आटोक्यात येत नाही असा उल्लेख केला. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक मंदिरे आहेत.
त्यातील काही मंदिरे जसे कि मुंबईमधील सिध्दिविनायक मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई मंदिर हे सर्व धर्मांसाठी आदर स्थान असल्यामुळे नेहमी गर्दीचे स्थान असते. असा वेळेस दो गज कि दुरी सारखे उपक्रम पाळले जाऊच शकत नाही. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय योग्यच असल्याचे शरद पवारांनी सांगितले. त्यामुळे राज्यपालांचे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेगवेगळे मत असू शकते. परंतु राज्यपालांनी पत्रात वापरलेली भाषा योग्य नाही. त्यामुळे राज्यपालांकडून असा प्रकार पुन्हा होऊ नये आणि राजकिय शिष्ठाचाराचे योग्य पालन व्हावा. यासाठी पत्रात राज्यपालांनी वापरलेल्या भाषेचा शरद पवारांनी पत्रात उल्लेख केलेला आहे.