मुंबई : पाच महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Strike) संपले असे वाटत असताना आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.
शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन करत आहेत. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला असून, अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
“मनसे” मध्ये राजीनामा सत्र, मोठी गळती; डोळ्यातील अश्रूमुळे खळबळ
अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करत आहेत.
आज संपकरी कर्मचारी अतिशय आक्रमक झाले आहेत. मोठ्या संख्येने आलेल्या कर्मचाऱ्यांना बोलण्यासाठी शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे बाहेर आल्या. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलण्यास तयार असल्याचे प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, सर्वांनी शांत राहावे. कुणीही दगडफेक आणि चप्पलफेक करू नये. माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहे, त्यांची सुरक्षा माझ्यासाठी महत्वाची आहे. मी सर्वांचे म्हणणे ऐकलाय तयार आहे फक्त त्यांनी शांत रहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
विवाहितेने पतीलाच फसवले, प्रियकराच्या मदतीनं स्वतःचेच केलं अपहरण
आशा व गटप्रवर्तक मानधनापासून वंचित, सरकारच्या फक्त घोषणाच; पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसणार ?