Thursday, April 25, 2024
Homeजिल्हाकोल्हापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी मेडशिंगीचे शंकरराव जाधव

कोल्हापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी मेडशिंगीचे शंकरराव जाधव

सांगोला / अतुल फसाले : कोल्हापूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून मेडशिंगी (ता.सांगोला) गावचे सुपुत्र शंकरराव जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. 

हेही वाचा ! धक्कादायक : नारायणगाव येथे कचऱ्यात आढळला पाय, “डॉक्टर आणि आया” यांचेवर गुन्हा दाखल

जाधव यांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. जाधव हे याआधी सांगली जिल्ह्यात भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. जाधव महसूल विभागातील सर्वात कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. 

निधनवार्ता : क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांचे निधन !

शंकरराव जाधव यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यात राजशिष्टाचार व खनिकर्म विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे. सातारा व सोलापूर जिल्ह्यातही त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. रायगड जिल्ह्यात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.

हेही पहा ! आजपर्यंत सत्यनारायण पूजा पाहिली असेल, पण आदिवासी संस्कृतींची आगळीवेगळी पूजा जरुर पहा!


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय