Wednesday, June 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पिंपरी चिंचवड : कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी 

पिंपरी चिंचवड : महानगरपालिका व कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ यांच्या वतीने दोन्ही दिवस कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील उमेद फाऊंडेशनचे सुधीर चव्हाण यांनी पहिल्या दिवशी करिअर मार्गदर्शन केले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

---Advertisement---

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जगताप तसेच जनसंपर्क विभागाचे पुराणिक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर मंगल कदम, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष पांडुरंग पाटील, सेक्रेटरी सुनील पाटील, कार्याध्यक्ष जगदीश परीट, खजिनदार मिलिंद वेल्हाळ, सामाजिक कार्यकर्ते कुशाग्र कदम, प्रकाश ढवळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले नामदेव यांनी आभार मानले.

26 जून छत्रपती शाहू महाराजांची 148 सगळी जयंती महानगरपालिका भवन व केएसबी चौक येथील शाहू महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जगताप तसेच पुराणिक मंगल कदम, लक्ष्मण टकेकर, अशोकराव दुर्गुळे, वसंतराव पाटील, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी शहरातील विविध संस्था तसेच कोल्हापूर जिल्हा वासीय खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

---Advertisement---

यावेळी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करून कृतिशील छत्रपती शाहू महाराज समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. याबाबत अनेक मान्यवरांची भाषणे झाली तसेच संभाजीनगर येथील उद्यानात समाजातील विविध स्तरावर सामाजिक काम करणाऱ्या महिला व पुरुष तसेच कोल्हापूर भूषण आणि दरवर्षीचा दिला जाणारा कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ पिंपरी चिंचवड यांच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार 2022 याचे वितरण करण्यात आले. 

यावर्षीचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार उद्योजक सुधीर तुकाराम पाटील यांना प्रदान करण्यात आला. उमेद फाऊंडेशनचे सुधीर चव्हाण आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महेश कमळकर यांना कोल्हापूर भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आणि सांस्कृतिक कार्यक्रभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकारी सल्लागार तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील कोल्हापूर वासीय खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन वसंतराव पाटील, सचिन साठे, मनोहर चौगुले, अक्षय पाटील, शिवाजी पाटील, कृष्णा पाटील, विजय नाळे आणि कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.

– क्रांतिकुमार कडुलकर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles