Saturday, April 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशहीद भगतसिंग यांची जयंती पुणे विद्यापीठात उत्साहात साजरी

शहीद भगतसिंग यांची जयंती पुणे विद्यापीठात उत्साहात साजरी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज शहीद भगतसिंग यांची 115 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य इमारती शेजारील संविधान स्तंभ येथे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली.

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त संशोधक विद्यार्थी सागर नाईक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भगतसिंग आणि त्यांचे क्रांतिकारी विचार या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. सार्वत्रिक आणि मोफत शिक्षणाची मागणी करणारे भगतसिंग यांचे विचार कधी नव्हे ते आज प्रासंगिक आहे असे या प्रसंगी अधोरेखित करण्यात आले. लोकशाही, समाजवाद, धर्म याविषयी भगतसिंग यांचे चिंतन अतिशय मूलगामी आणि प्रासंगिक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

पुढे ते म्हणाले, भगतसिंग राष्ट्रवादी, स्वप्नाळू क्रांतिकारी, काही काळ साम्यवादी आणि मग मार्क्सवादी शास्त्रीय समाजवादी या चार टप्प्यामधून गेले. भगतसिंगांच्या राजकीय वाटचालीचा एकंदर काळ हा फार तर 7 ते 10 वर्षाचा आहे आणि या काळात तो या चार टप्प्यामधून विकसित होत गेले. असे ‘मी नास्तिक का आहे’ आणि ‘युवा क्रांतिकारकांना पत्र’ या दोन दस्तऐवजात भगतसिंगाने स्वतःच म्हटले होते.

यावेळी ओम बोदले यांनीही विचार व्यक्त केले. अनिल गायकवाड यांनी प्रस्ताविक तर तुकाराम शिंदे यांनी आभार मानले. त्यावेळी स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), युवक क्रांती दल (युक्रांद), दलित पँथर या संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध विभागातील विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय