Saturday, October 5, 2024
Homeराज्यराज्यात पुन्हा बर्ड फ्ल्यूमुळे खळबळ, ३०० कोंबड्या दगावल्या

राज्यात पुन्हा बर्ड फ्ल्यूमुळे खळबळ, ३०० कोंबड्या दगावल्या

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. मेलेल्या कोंबड्याची तपासणी असता ३०० कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू (bird flu) झाल्याचे उघडकीस आले आहे.

राज्यात कोरोनाचं संकट असताना गेल्यावर्षी बर्ड फ्ल्यू आला होता. त्यावेळी राज्यातील लाखो पक्षांचा जीव गेला होता. यात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा शहापूर तालुक्यात बर्ड फ्लूमुळं कोंबड्या तडफडून मरत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून अनेक कोंबड्या वारंवार मरत असल्याने या संदर्भात पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली. त्यावेळी कोबड्यांची तपासणी केली असता ३०० कोंबड्या बर्ड फ्ल्यूने मेल्या असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, बर्ड फ्ल्यूमुळं कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकिस आल्यानंतर बर्ड फ्ल्यू वाढू नये यासाठी दगावलेल्या कोंबड्या पोल्ट्रीपासून एक किलोमीटरच्या परिघात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय