Tuesday, March 25, 2025
---Advertisement---
---Advertisement---

शहापूर : SFI – DYFI च्या वतीने नायब तहसीलदारांना सादर केली मागण्यांची सनद

---Advertisement---

---Advertisement---

शहापूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) व डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या विद्यार्थी व युवक संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार अधिकारी यांना शैक्षणिक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

निवेदन देतेवेळी DYFI जिल्हा कमिटी सदस्य प्रकाश चौधरी, तालुका कमिटी सदस्य सुनील करपट, SFI चे ठाणे – पालघर जिल्हा सचिव भास्कर म्हसे उपस्थित होते.  

यावेळी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येला जबाबदार एमपीएससी व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)च्या रखडलेल्या परीक्षा त्वरित घेण्यात याव्यात आणि नवीन पदभरती लवकर जाहीर करावी. तसेच शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून ते सोडविण्यासाठी एसएफआय व डीवायएफआयने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. याद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन पाठविण्यात आले.

■ SFI – DYFI मागण्यांची सनद पुढीलप्रमाणे :

● आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व एमपीएससी परीक्षांची पूर्तता करावी. तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागांवर ३१ जुलै पर्यंत भरती झाली पाहिजे. 

● सरकारी विभागातील सर्व भरत्या एमपीएससीच्या माध्यमातून कराव्यात. शासकीय विभागातील भरतीसाठी महापोर्टल बंद करावे. सरकारी विभागासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेची खासगी एजन्सींना आऊटसोर्सिंग बंद करावी, कारण खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व अचूकता नसते. 

● विविध सरकारी विभागांमधील सर्व रिक्त जागा घोषित कराव्यात. भरती प्रक्रिया पारदर्शकतेने पूर्ण झाली पाहिजे. 

● विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकणार्‍या खासगी शाळांचा परवाना सरकारने रद्द करावा. 

● खासगी शाळांमध्ये  50% फी कमी करावी. हे नोंद घेण्यासारखे आहे की, वर्ग ऑनलाईन घेण्यात आल्यामुळे गेल्या वर्षी शाळांचा ऑपरेटिंग खर्च बराच घटला आहे. 

● राज्यातील सर्व शालेय, महाविद्यालयीन व विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे मागील व चालू वर्षाचे संपूर्ण परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क माफ करावे.

● आरटीई प्रवेश योग्य प्रकारे होत आहेत याची खातरजमा सरकारने केली पाहिजे. 

---Advertisement---

● आरटीई प्रवेशामुळे खासगी शाळांना फीच्या रकमेचा अनुशेष सरकारने तातडीने दिला पाहिजे.

          

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles