Saturday, April 20, 2024
Homeजिल्हाएसएफआयचे बीड तालुका अधिवेशन संपन्न !

एसएफआयचे बीड तालुका अधिवेशन संपन्न !

नवीन तालुका अध्यक्षपदी शिवा चव्हाण तर तालुका सचिवपदी विष्णू गवळी यांची निवड !

बीड (ता.११) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे बीड तालुका अधिवेशन आज शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी शहरातील लोकमान्य पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाले. अधिवेशनास एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी मार्गदर्शन केली.

या अधिवेशनात बोलताना जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क आणि अधिकाराची लढाई एसएफआय लढते आहे. भाजपच्या सरकारने शिक्षणात चुकीचे धोरण राबवल्याने, शिक्षण प्रचंड महागले आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या सोडविण्यासाठी एसएफआयच्या बॅनरखाली एकत्र येऊन आपला संघर्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन रोहिदास जाधव यांनी केले.

या अधिवेशनात बीडच्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी उपस्थित होते. या अधिवेशन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवा चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन विष्णू गवळी यांनी केले.

या अधिवेशनात २८ सदस्यांची नवीन बीड तालुका कमिटी निवडण्यात आली. त्यामध्ये नवीन तालुका अध्यक्ष म्हणून शिवा चव्हाण तर तालुका सचिव म्हणून विष्णू गवळी यांची एकमताने निवड करण्यात आली. तालुका उपाध्यक्ष म्हणून युवराज चव्हाण, विजय लोखंडे आणि अक्षय वाघमारे तर सहसचिव म्हणून आनंद भालेराव, शैलेश आबुज, ऋषिकेश कोकाटे, निखिल पुंडगे यांची निवड करण्यात आली.

नवीन तालुका कमिटीमध्ये सदस्य म्हणून राहुल चव्हाण, निखिल शिंदे, सत्यप्रेम राठोड, अमोल जाधव, शिवा भोकरे, आकाश कचरे, राजे डावकर, सुनील आडे, प्रताप सोळंके, दत्ता सोलनकर, रमेश नाईकवाडे, लक्ष्मण कऱ्हे, सोमेश शिंदे, आशिष लोंढे, अरुण चव्हाण, वैभव यादव, दीपक शिंदे, प्रदीप चव्हाण, माऊली नाईकवाडे यांची निवड करण्यात आली आहे.

LIC life insurance corporation
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय