Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

एसएफआय तर्फे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

---Advertisement---

कोल्हापूर (ता.२३) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने आज (ता.२३) पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मदत करण्यात आली. 

---Advertisement---

कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी या गावी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शालेय मुलींना गणवेश तसेच वह्या, रजिस्टर्स, पेन इ. स्वरूपातील साहित्य देऊन मदत करण्यात आली. शैक्षणिक मदत वितरण एसएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.पी. सानू यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनचळवळीचे नेते प्राचार्य ए. बी. पाटील हे होते. एसएफआयचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष कविता वरे, सोमनाथ निर्मळ, राज्य सहसचिव मल्लेशम कारमपुरी, राज्य कमिटी सदस्य तुळशीराम गळवे यांच्यासह शाम आडम, अश्विनी आडम आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

एसएफआयने आपली सामाजिक बांधिलकी जपत राज्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मदत करण्याचा संकल्प केला. एसएफआय तर्फे २०१९ मध्ये सुद्धा अशा स्वरूपातील मदत मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे त्या भागातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सुद्धा शैक्षणिक साहित्य पूर परिस्थितीत वाहून गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. शिक्षण उपयोगी साहित्याविना कोणी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या हेतूने हा कार्यक्रम एसएफआयने राबवला. म्हणून पूरग्रस्त भागातील अत्यंत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून संघटनेने मदत उभी केली होती. यातूनच आज कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी या गावात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून मदत करण्यात आली. या कार्यक्रमात इंगळी गाव आणि या परिसरातील विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली. या विद्यार्थ्यांमध्ये आजूबाजूच्या अनेक गावातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एसएफआय कोल्हापूर जिल्हा कमिटीचे सदस्य प्रमोद मोहिते, ज्ञानदेव पडळकर, विनय कोळी, संदेश जाधव, यांच्यासह जनचळवळीचे कॉ. विकास पाटील, कॉ.राजू शिंदे, कॉ.आण्णासाहेब कांबळे, कॉ.चंद्रकला मगदूम, कॉ.अश्विनी पाटील, कॉ.मुमताज हैदर, अर्चना पाटील, कॉ.राजश्री पाटील, कॉ.ज्योती सुतार आदींनी परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles