Tuesday, April 23, 2024
Homeजिल्हाSFI - DYFI तर्फे MPSC च्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात सिरसळा पोलीस स्टेशन...

SFI – DYFI तर्फे MPSC च्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात सिरसळा पोलीस स्टेशन येथे निदर्शने

परळी / अशोक शेरकर : राज्यातील विद्यार्थी व युवकांच्या विविध मागण्यांना घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आज सिरसला येथे SFI व DYFI च्य वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन राज्य व केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

■ SFI – DYFI आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

1.स्वप्नील लोणकर याच्या कुटूंबियांना शासनाने योग्य ती मदत करून स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना दिलासा द्यावा.

2. आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व एमपीएससी परीक्षांची पूर्तता करावी. तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागांवर 31 जुलै पर्यंत भरती झाली पाहिजे.

3. सरकारी विभागातील सर्व भरत्या एमपीएससीच्या माध्यमातून कराव्यात. शासकीय विभागातील भरतीसाठी महापोर्टल बंद करावे. सरकारी विभागासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेची खासगी एजन्सींना आऊटसोर्सिंग बंद करावी, कारण खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व अचूकता नसते.

4. विविध सरकारी विभागांमधील सर्व रिक्त जागा घोषित कराव्यात. भरती प्रक्रिया पुरेशा पारदर्शकतेने पूर्ण झाली पाहिजे.

5. विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकणार्‍या खासगी शाळांचा परवाना सरकारने रद्द करावा.

6. खासगी शाळांमध्ये  50% फी कमी करावी. हे नोंद घेण्यासारखे आहे की, वर्ग ऑनलाईन घेण्यात आल्यामुळे गेल्या वर्षी शाळांचा ऑपरेटिंग खर्च बराच घटला आहे.

8. आरटीई प्रवेश योग्य प्रकारे होत आहेत याची खातरजमा सरकारने केली पाहिजे.

9. आरटीई प्रवेशामुळे खासगी शाळांना फीच्या रकमेचा अनुशेष सरकारने तातडीने दिला पाहिजे.

   

यावेळी DYFI चे कॉ.मदन वाघमारे, कॉ.प्रविण देशमुख, कॉ.विशाल देशमुख, कॉ.मनोज स्वामी, राज शेरकर, सचिन क्षीरसागर, बाबा शेरकर, ब्रह्मानंद देशमुख, महादेव मोरे हे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय