औरंगाबाद : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे आंदोलन केले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन प्र.कुलगुरुंना देण्यात आले. SFI protest at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University!

समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला एक महिन्याचा वेळ दिला आहे. निवेदनातील मागण्यांची पूर्तता एका महिन्यात झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा SFI ने दिला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व SFI औरंगाबाद जिल्हा सचिव (प्र.) मनिषा बल्लाळ, विद्यापीठ समिती अध्यक्ष अरुण मते, राज्य सचिवमंडळ सदस्य पल्लवी बोरडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले.