वडवणी : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेच्या वडवणी तालुका कार्यालयात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करून
एसएफआय वडवणी तालुका कमिटीच्या वतीने क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना एसएफआयचे बीड जिल्हाध्यक्ष लहू खारगे म्हणाले, स्वराज्य संस्थापक, आदर्श शासनकर्ते, प्रजाहितदक्ष, धर्मनिरपेक्ष, कल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्वत्र ख्याती आहे. संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे विद्यार्थ्यासाठी आदर्श असून त्यांचे विचार तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवणे व त्याची जोपासना करून आचरणात आणणे हे सर्व विद्यार्थ्यांचे कर्तव्य असल्याचेही खारगे म्हणाले.
यावेळी एसएफआयचे तालुकाध्यक्ष ज्योतीराम कलेढोण, तालुका सचिव विजय अडागळे, गणेश दिवटे, अमर बडे, आसाराम टकले, अभिषेक भुजबळ, परमेश्वर कलेढोण, अवधूत होगाडे, लक्ष्मण भुजबळ आदी पदाधिकारी, विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.