पुणे : आदिवासी विद्यार्थ्यांना मुदत संपत आलेल्या दुध वाटपाविरोधात काल १६ सप्टेंबर रोजी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया पुणे जिल्हा समितीच्या वतीने मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांना एकाच वेळी विविध मागण्यांचे ईमेल पाठवून आंदोलन करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील राजपुर, बोरघर, तेरुंगण, जंभोरी, डो
आदिवासी विद्यार्थ्यांना मुदत संपत आलेलं दूध वाटप केलं गेलं होतं, हे दुध वाटप करणाऱ्या प्रकल्प अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करा, खरंच जर विद्यार्थ्यांची काळजी असेल तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या.आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, DBT व स्वयंम योजनेची ची थकीत रक्कम विद्यार्थ्यांना त्वरित वितरित करा, आदी मागण्या या आंदोलन करण्यात आल्या.
या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक, युवतींनी हातात विविध मागण्यांचे पोस्टर्स घेऊन, दगडाला दुधाचा अभिषेक घालुन तसेच निषेधाचे पोस्टर्स आपल्या सोशल मीडियावर व्हायरल करून निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात ‘एसएफआय’चे अविनाश गवारी, रवी साबळे, सचिन साबळे, समिर गारे, निविता इदे, आंबे-पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे आदीसह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह नागरिक सहभागी झाले होते.