Wednesday, April 24, 2024
Homeग्रामीणऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यात रिचार्जचे पैसे जमा करण्याची SFI ची मागणी

ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यात रिचार्जचे पैसे जमा करण्याची SFI ची मागणी

माहूर : राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था मधील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्गासाठी मोबाईलच्या रिचार्जचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) माहूर तालुका कमिटीने केली आहे. या संबंधीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तहसीलदारांमार्फत देण्यात आले आहे.

राज्यातील वैद्यकीय, तंत्रनिकेतन, उच्चतंत्र व उच्च व माध्यमिक या सर्व संस्थांचे शैक्षणिक वर्ग हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या वडिलांचे सर्व व्यवसाय कामधंदे बंद पडली आहेत. या काळात दोन टाईमच्या जेवन्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे आणि त्यात आपल्या पाल्यांच्या ऑनलाइन वर्गासाठी मोबाईलचे रिचार्जे करणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे. या काळात असंख्य विद्यार्थ्यांचे मोबाईल मध्ये रिचार्जे नसल्याने त्यांचे वर्ग रोज बुडत आहेत. या गंभीर समस्येकडे राज्यसरकारने त्वरित लक्ष घालून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रिचार्जे चे पैसे टाकावे अशी मागणी एसएफआय माहूर तालुका कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी एसएफआय नांदेड जिल्हा सहसचिव प्रफुल्ल कउडकर, अभिषेक खंदारे, प्रदीप कउडकर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय